testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाहरूख-कतरिना पुन्हा एकत्र

‘जब तक है जान’ या सिनेमातील सुपरहिट जोडी शाहरुख खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात ही हिट जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. आनंद, शाहरुख आणि कतरिना यांच्यात नुकतीच याविषयी पहिली चर्चा झाली.

2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. शाहरुख आणि कतरिना यां दोघां एकत्र बघण्यासाठी दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. शाहरुख आणि कतरिना हे दोघेही नुकतेच एका हॉटेलच्या बाहेर पडताना दिसल्यामुळे चर्चा सुरू झाली. हे दोघंही दिग्दर्शक आनंद राय यांना भेटायला आले होते.

या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यात एक खास गाणेही असून त्यात शाहरुखसोबत काम केलेल्या सगळ्याच अभिनेत्रीं नाचताना दिसणार आहे. या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.


यावर अधिक वाचा :