बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:01 IST)

श्याम बेनेगल यांना ‘व्ही.शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार

यंदाचा ‘व्ही.शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला. राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-२०१८ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांच्या समितीने श्याम बेनेगल यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला. भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला.

श्याम बेनेगल २८ सिनेमांचे दिग्दर्शन केले असून त्यांनी ४१ माहितीपटांची निर्मिती केली आहे.  तब्बल नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.