शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By
Last Modified: शनिवार, 20 जानेवारी 2018 (11:47 IST)

अर्थसंकल्पाची छपाई व गोपनीयता

अर्थसंकल्प एक अत्यंत गोपनीय दस्ताऐवज मानला जातो. अर्थसंकल्पाची रचना, त्यातील तरतूदी इथपासून, ते अर्थसंकल्पाच्या छपाईपर्यंत अत्यंत गोपनीयता पाळली जाते. नॉर्थ ब्लॉकमधील अर्थमंत्र्यांच्या कार्यालयात बंदोबस्तात हे काम पूर्ण केले जाते.
 
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सहा दिवस आधी याच्या छपाईस सुरवात होते. अर्थ मंत्रालयातील या सार्‍या छपाई कर्मचार्‍यांनाही अर्थसंकल्प छपाईस सुरवात झाल्यापासून तो संसदेत सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडण्याची मुळीच परवानगी नसते. छपाई इतकी गोपनीय असते, की अर्थमंत्रांच्या आदेशाशिवाय यात इतर कोणालाही बदल करण्याची परवानगी नसते.
 
1950 पूर्वी राष्ट्रपती भवनातच सर्व गोपनीय कागदपत्रांची छपाई केली जात असे. परंतु, यानंतर अर्थसंकल्प छपाईचे ठिकाण बदलण्यात आले. 1980 पर्यंत केवळ अर्थमंत्र्यांचेच भाषण नॉर्थ ब्लॉकमध्ये छापले जायचे. परंतु, स्वत:चा छापखाना सुरू केल्यानंतर अर्थसंकल्पाची छपाईही इथूनच सुरू झाली.