testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

40 वर्षांत प्रथच ब्राझीलला पहिला सामना जिंकता आला नाही

football world cup
रोस्टोव| Last Modified मंगळवार, 19 जून 2018 (10:50 IST)
माजी विश्वचषक विजेत ब्राझीलच्या संघाला चाळीस वर्षांत प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सलामीचा पहिला सामना जिंकता आला नाही.
रविवारी दोन सामन्यात आश्चर्यकारक निकालाची नोंद झाली. मेक्सिकोने माजी विजेत्या र्जमनीला 1-0 ने पराभवाचा धक्का दिल्यानंतर स्वित्झर्लंडने ब्राझील संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. हा सामना खेळला जाण्यापूर्वी ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जात होती परंतु स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.

ब्राझीलच्या फिलीप कोतिन्होने सामन्याच्या 20 व्या मिनिटाला शानदार असा मैदानी गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलपोस्टपासून बरच लांब अंतरावरून मारलेला हा फटका स्वीत्झर्लंडच्या गोलरक्षकाला रोखता आला नाही. मध्यांतरापर्यंत ब्राझीलकडे 1-0 अशी आघाडी होती आणि ब्राझीलचेच चेंडूवर नियंत्रण होते. चेंडूवर ताबा मिळविणसाठी स्वीस खेळाडू संघर्ष करीत होते.
सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले होते; परंतु उत्तरार्धात 50 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या स्टीव्हन झुबेरने पेनल्टी कॉर्नरवर हेडरच्या साहाय्याने जबरदस्त गोल केला व संघाला महत्त्वपूर्ण 1-1 अशी बरोबरी साधली.

त्यानंतर ब्राझील व स्वीस संघांनी एकमेकांवर गोल करण्याचे प्रयत्न केले; परंतु कोणालाही यश मिळाले नाही. अखेर गट ई मधला सामना बरोबरीत सुटला व दोन्ही संघाला एकेक गुणावर समाधान मानावे लागले.
रोस्टोव एरीना स्टेडियमवरील हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती स्टेडिम हे प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमारसुध्दा या लढतीत खेळला. अनेक विश्वचषक खेळण्यचा अनुभव असलेल्या नेयमारला चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण तो फारसा चमकला नाही.


यावर अधिक वाचा :

'अक्षय कुमार', जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची ...

national news
अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयनं काम केलं. चित्रपटाच्या माध्यामातून ...

राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्या दौऱ्यावर

national news
येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.पुणे, ...

कार बनणार उडनखटोला, 400 किमी प्रति तास गतीने भरेल उड्डाण

national news
एकदा चार्ज केल्यावर एखादी कार आपल्याला 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जाईल तेही हवेत उडत, तर ...

चेन्नईमध्ये 11 वर्षाच्या मुलीसोबत 7 महिन्यांपर्यंत ...

national news
तमिळनाडूची राजधानी चेन्नई स्थित एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये 11 वर्षाच्या एका मुलीसोबत ...

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?

national news
स्वीस बँकेतील काळ्या पैशांवरून भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...