testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बिल गेट्स यांनी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ ची केली प्रशंसा

Last Modified गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:25 IST)

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या बिल गेट्स यांनी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या चित्रपटाविषयी प्रशंसा करणारे ट्विट करत गेट्स यांनी अनेकांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

२०१७ मध्ये संपादन केलेले यश आणि काही महत्त्वाच्या उपक्रमांविषयी ट्विट करतानाच त्यांनी अक्षय कुमारच्या चित्रपटांचा मुद्दा मांडला. भारतात स्वच्छता मोहीमेविषयी जनजागृती करण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे, असे ट्विट त्यांनी केले. ग्रामीण भागांमध्ये स्वच्छता आणि त्याच्याशी निगडीत काही समजुतींवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले होते.यावर अधिक वाचा :