Widgets Magazine

सौदीमध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी

सौदी अरेबियाचे प्रमुख राजे सलमान यांनी देशातील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय सौदीतील महिलांच्यादृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. सौदीमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब किंवा आयबा परिधान करावा लागतो.

याशिवाय, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातही त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत. हे नियम मोडणाऱ्या महिलांना तुरूंगवास किंवा चाबकाने मारण्याची शिक्षा दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली आहे. २०१५ मध्ये सौदी अरेबियातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.


यावर अधिक वाचा :