testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हा किडा चावल्याने होतो लैंगिक आजार, काय आहे सत्य...

हवामान बदल्यामुळे संपूर्ण विश्वात अनेक संसर्गजन्य आजार पसरत आहे। असे नवीन-नवीन आजार समोर येताय की डॉक्टर्सदेखील हैराण आहेत.
ब्रिटन येथील काही शहरांमध्ये एक नवीन प्रकारचे किडे दिसून येत असून विचित्र अफवा पसरल्या आहेत. बीरबहूटी या नावाच्या किड्यामुळे लैंगिक आजार (सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज-STD) होण्याची शक्यता आहे असे म्हटले जातंय. हा किडा चावल्यास तो आजार संक्रमण पसरवतोय.

पूर्ण युरोपात सोशल मीडियावर या किड्याचे फोटो आणि चेतावणी शेअर केली जात आहे. Harlequin ladybirds नामक या किड्याची पाठ काळ्या रंगाची आहे. तज्ज्ञांप्रमाणे आशिया आणि नॉर्थ अमेरिकेहून या किड्याची प्रजाती या बाजूला येत आहे.
या किड्यामुळे सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीज होण्याची शक्यता असल्याची अफवा पसरल्यानंतर वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी यावर शोध केले. त्यांच्याप्रमाणे हे किडे आजार पसरवण्यात अक्षम आहे परंतू याच्यामुळे लेबोयुल्बेनेअलस नामक एक फंगस मानवी शरीरात पोहचू शकतो तरी या फंगसमुळे काही गंभीर नुकसान होण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :