बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (17:28 IST)

सर्वाधिक श्रीमंत यूट्युबर : 'डॅन मिडल्टन

साल २०१७ मधल्या सर्वाधिक श्रीमंत यूट्युबरच्या यादीत २६ वर्षांच्या डॅन मिडल्टने स्थान पटकावल आहे.  ‘फोर्ब्स’च्या माहितीनुसार डॅनचं वार्षिक उत्पन्न हे ८० ते ९० कोटींच्या आसपास आहे. डॅनचा ‘DanTDM’ हा यूट्युब चॅनेल आहे. व्हिडिओ गेम्सचे रिव्ह्यू तो देतो. त्याच्या गेम्स रिव्ह्यूंना तरुणांची चांगलीच पसंती लाभली आहे. त्याच्या अनेक व्हिडिओंना दीड कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेक यूट्युबरचे व्ह्यूज हे लाखोंच्या घरात असतात पण डॅनच्या बाबतीत मात्र व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. फोर्ब्स मासिकानं २०१७ च्या श्रीमंत यूट्युबरच्या यादीत त्याला स्थान दिले आहे.