शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

माउसला पर्याय असलेला कंट्रोलर विकसित

बर्लिन- दैनंदिन जीवनातील वापरात असलेली अनेक उपकरणेही भलतीच हायटेक होत चालली आहेत. त्यासाठीचे तंत्र संशोधकांकडून वेळोवेळी अद्यायावत केले जाते. जर्मनीतल बर्लिनमधील मायनॉरिटी रिपोर्ट या साय-फाय कंपनीतील इंजिनिअर्स आणि कॉम्प्यूटर संशोधकांनी आता फ्लो हा छोटा प्रोगॅमेबल वायरलेस कंट्रोलर विकसित केला आहे.
 
सध्या माउस वापरुन जी कामे केली जातात ती सर्व कामे हा कंट्रोलर सहजपणे करु शकतो. विशेष म्हणजे माउसपेक्षा हा अधिक संवेदनशील, लवचिक आणि सोईस्कर आहे. फ्लोच्या वर हवेत विशिष्ट पद्धतीने हात फिरवल्यास किंवा त्याला स्पर्श केल्यास आपल्याला डॉक्युमेंट एडिट करता येईल.