testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गोनींचा किल्ला

gonicha killa
जांभीवलीहून या किल्ल्याला जावे लागते. हा प्रवास लोणावळ्याहून सुरू होतो. बरोबर मार्गदर्शक होता. आम्ही आठ-दहा जण निघालो होतो. चालताना विश्रंतीसाठी एक-दोन वेळा मोकळ्या टेकडय़ांवर थांबून पहाटे तीनच्या सुमारास जंगलाच्या अंतर्भागात पोहोचलो. प्रत्येकाजवळ
टॉर्च होता. विसाव्यासाठी इथे थोडी मोकळी जागा होती. बहुतेकांजवळ कॅरी, मॅट, स्लिपिंग बॅग्ज असा सुसज्ज सरंजाम होता. थोडेच लोक फक्त चादर घेऊन आले होते. काहींनी काटक्या, लाकडे गोळा करून शेकोटी पेटविली. सर्वानी या ठिकाणी झोप घेतली.

सकाळी ब्रेड-बटर जॅम अशी न्याहरी करून पुढच्या वाटेला लागलो. लोणावळा-भीमाशंकर ही वाट उजव्या हाताला जंगलातून खुणावत होती. तिथून पुढे गेल्यावर गावकर्‍यांनी लावलेली पाटी दिसली. ‘ढाक-बहिरी पवित्र गुहा-स्त्रिांना प्रवेश नाही’ पुढे एका वळणाने अशा जागी नेले की तिथून समोर डोळे फिरवून टाकणारी खोल दरी दिसत होती आणि दगडाच्या बेचक्यातील वाट एवढी निमुळती आणि खोल होती की तिथून सॅकसहित उतरणे शक्य नव्हते. एकजण खाली गेला आणि मध्ये साखळी करून सगळंच सॅक प्रथम खाली पाठविल्या आणि नंतर सगळे उतरले.
gonincha killa
इथून पुढे खरा कस लागणार होता. उजव्या हाताला एक छोटीशी गुहा दिसली. तातडीने पुढे जाला हवे होते. दगड तापलवर ते पार करणे अशक्य असते. उजवीकडे प्रचंड कातळ आणि डावीकडे खोल दरी. अरुंद वाट पार करताना कमालीच एकाग्रतेची आवश्कता होती.

अति कष्टाने बहिरीच गुहेमध्ये प्रवेश केला. येथे बहिरीदेवाची, श्रीगणेशाची आणि भवानीदेवीची मूर्ती आहे. समोर दिसणारे विहंगम पर्वत बघताना भान हरपून गेले.
ठाकरांच्या या बहिरी देवाला नतमस्तक होऊन एका अवघड वाटेने 2700 फूट उंचीवर पोहोचल्यावर समोर राजमाचीचे श्रीवर्धन, मनरंजन, माणिकगड, कर्नाळा, भीमाशंकर, ड्युक्सनोज, विसापूर सगळेजण हात जोडून आम्हाला दर्शन देत होते.

हवा अगदी स्वच्छ होती. परतीच्या प्रवासात अंधारातली गुंफा आणि भूतकाळातला किल्ला चिरंतन आठवणीत राहिला. गोनींचा किल्ला अशीही या किल्ल्याची ओळख आहे.
म. अ. खाडिलकर


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

नाटक “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार रात्रौ 8.00 वाजता ...

national news
“थिएटर ऑफ रेलेवन्स” अभ्यासक आणि शुभचिंतक आयोजित नाटक “राजगति” 23 जानेवारी 2019, बुधवार ...

रागावलात कोणावरतरी

national news
रागावलात कोणावरतरी मग बोलण्यापूर्वी विचार करा

निती मोहनने केले या गायिकेला रिप्लेस

national news
रायझिंग स्टार हा रिअ‍ॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या शंकर ...

शकिरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप

national news
पॉप संगीतकार शकिरा आपली आगळी वेगळी संगीत शैली व नृत्यासाठी ओळखली जाते. 1990 साली तिने ...

सारामुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता?

national news
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा ...