testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल

एकदा आम्ही परत तुमच्यासाठी आणले आहे “राशिफल 2018”,जे वैदिक ज्योतिषावर आधारित आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहे की येणारे नवीन वर्ष अर्थात 2018 तुमच्यासाठी काय नवीन आणणार आहे. तसेच या भविष्यवाणीद्वारे आम्ही तुमच्या जीवनातील काही विषयांवर देखील चर्चा करू, जसे पारिवारिक जीवन कसे राहील, आर्थिक जीवनात काय बदल होईल, खरे प्रेम मिळणार आहे की नाही, अभ्यासात यश मिळेल का, नोकरी व्यवसाय कसा चालेल. तर बघूया नवीन वर्ष 2018 तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे?
मेष राशिफल 2018
मेष राशीच्या जातकांसाठी 2018च्या भविष्यवाणीबद्दल सांगायचे झाले तर जोडीदारासोबतचे नाते संपूर्ण वर्षभर आनंदाचे राहणार आहे. निवास स्थानात बदल होण्याची शक्यता आहे किंवा घराला पेंट करवू शकता. काही जातकांच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे अर्थात ते नोकरीत बदल करतील. आर्थिक आणि सामाजिक थोरावर तुमचा विकास होईल. वडील आणि घरातील मोठ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. आईबद्दल बोलायचे झाले तर तिला शांततेची गरज राहणार आहे, कारण भावनात्मक तणावामुळे ती थोडी परेशान राहू शकते. मेष राशीच्या काही जातकांची आवड धार्मिक आणि प्राच्य शास्त्रांच्या अध्ययनाकडे राहणार आहे, तसेच काही लोक आध्यात्मिक कार्यांमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवणे पसंत करतील. दीर्घकालीन प्रवासाचा योग घडून येत आहे. काही लोक कामाच्या निमित्त प्रवास करतील आणि काही लोक एकांतात वेळ घालवण्यासाठी लांबचा प्रवास करतील.
उपाय: या वर्षी उपाय म्हणून महादेवाची आराधना केल्याने जीवन मंगल होईल आणि उत्तम परिणामाची प्राप्ती होईल.

वृषभ वार्षिक राशिफल 2018

सारांश: राशिफल 2018नुसार वृषभ राशीच्या जातकांना या वर्षी काही चढ उतार बघावे लागणार आहे. पारिवारिक जीवनात विवाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या त्रस्त राहू शकता. कुटुंबात वडिलांसोबत तणावपूर्ण संबंधांचा अनुभव जाणवेल तर कार्यस्थळात बॉसशी देखील विवाद होऊ शकतो. वर्तमान कार्यालय किंवा जॉबमुळे असंतुष्ट होऊन तुम्ही जॉब चेंज करण्याचा प्लान करू शकता. भविष्यफलानुसार काही चांगल्या संधी तुम्हाला जरूर मिळतील. तुम्ही तुमचे साहस, प्रयास व कार्यांमध्ये बढती अनुभवाल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे पण दुसरीकडे तुमचे खर्चे देखील वाढतील. म्हणून या वर्षी एक चांगल्या वित्तीय नियोजनाचे पालन केले पाहिजे. जोखीमीचे गुंतवणूक करू नये. जर तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर त्यावर थोडे विचार करून पूर्ण रिसर्च नक्की करावे. आरोग्याच्या बाबतीत या वर्षी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य विषयक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. स्वस्थ आहार व जीवनशैलीचा प्रयोग करावा. त्यासोबतच व्यायाम, योगा व ध्यान इत्यादीच्या माध्यमाने फिटनेसवर देखील लक्ष द्या. भविष्यावाणी 2018 नुसार या वर्षी लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये तणाव राहण्याची शक्यता आहे. नाते तुटू नये म्हणून सांभाळून ठेवा आणि वाणीवर संयम ठेवावे. आपले जोडीदार किंवा लव्ह पार्टनरसोबत बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. कोर्ट कचेरी किंवा कायदेविषयक प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागेल.
उपाय: रोज लक्ष्मीची पूजा करावी आणि आपल्या कुटुंबातील स्त्रियांना सिल्कचे वस्त्र दान करावे.


यावर अधिक वाचा :