मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी

आता  हॉटेलच्या बिलात मोठी  कपात झाली आहे. हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. ते मुंबई बोलत होते.
 
कोणत्याही हॉटेलचालकाने 5 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी आकारल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही बापटांनी दिला आहे.
 
याआधी वेगवेगळ्या क्लासच्या हॉटेल्सना वेगवेगळा जीएसटी लावण्यात आला होता. 9 टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागल्याने चहूबाजूने टीका सुरु झाली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट 5 टक्के जीएसटी लागणार असल्याचं घोषित केलं. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाली आहे. 
 
जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे.’ अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली आहे.