रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. तर, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली. पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. तर दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात होईल. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.
 
आतापर्यत अर्थसंकल्प सादर करण्याची तारिख २८ फेब्रुवारी असायची. मात्र, सध्याच्या मोदी सरकारने २०१७ पासून ही अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केले आहे. तसेच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करुन मुख्य अर्थसंकल्पातच तो समाविष्ट करण्यात आला आहे.