शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

नाविन्यपूर्ण एटीएम, पिनची किंवा कार्डची गरज नाही

येस बँक आता नाविन्यपूर्ण एटीएम आणत आहे. जे वापरण्यासाठी पिनची किंवा कार्डची या दोघांची गरज असरणार नाही. यासाठी येस बँकेने फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत करार केला आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. नियरबायने ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केलं आहे.
 
यासाठी पे नियरबाय अॅपचा वापर स्मार्टफोनवरही करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. यातूनच कॅश जमा करणं किंवा काढण्याची सुविधा मिळेल, असं येस बँकेने म्हटलं आहे. ग्राहक आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.