बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (10:05 IST)

भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली

टीम इंडियाने विशाखापट्टणमच्या वन डेत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. यामध्ये धवनच्या नाबाद 100 धावांचा समावेश होता. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारतीय संघाने जिंकलेली ही वन डे सामन्यांची आठवी मालिका ठरली. या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढून त्यांना साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा 3 बाद 160 धावांवरून 215 धावांत खुर्दा उडाला.

त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण धवन आणि श्रेयसने 135 धावांची भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयसने 63 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.