मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

६ वर्षाचा रायन यादीत 9 व्या स्थानावर

फोर्ब्सने यू-ट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांची टॉप 10 लोकांची यादी जाहीर केली. यात  6 वर्षांचा रायन यादीत तो 9 व्या स्थानावर आहे. या मुलाने यू-ट्यूबच्या माध्यमातून वर्षभरात 11 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 71 कोटी रूपये कमावले आहेत. यानुसार हा मुलगा एका महिन्यात सुमारे 6 कोटी रुपये कमावतो. 
 

या मुलाचे नाव रायन टॉयज रिव्यू असे असून त्याचे यू-ट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. करो़डो लोक त्याचे चॅनल पाहतात. रायन आणि त्याच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या या चॅनलमध्ये खेळण्यांचा रिव्यू केला जातो. जुलै 2015 मध्ये म्हणजे रायन 4 वर्षांच्या असताना हे चॅनल सुरू केले. आतापर्यंत खूप व्हिडिओज चॅनलवर अपलोड केले आहेत. 

 

'जायंट एग सरप्राईज' या चॅनलला 80 कोटींहून अधिक व्यूज आले आहेत. त्याचबरोबर 10 मिलियन म्हणजे 1 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. खेळण्यांबरोबरच लहान मुलांच्या फूड आयटमचे देखील येथे रिव्यू केले जातात.