बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कारमध्ये बसल्याक्षणी एसी ऑन करता? तर ही माहिती आपल्यासाठी आहे

एसी कार मध्ये बसणार्‍यांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. आम्ही आपल्याला घाबरण्यासाठी हे सांगत नाहीये. एका शोधात हे आढळून आलंय. हे त्या लोकांसाठी अधिक धोकादायक आहे जे काच बंद असलेल्या गाडीत बसल्याक्षणी एसी ऑन करतात.
 
विचार करून बघा, जेव्हा आपण कारमध्ये बसल्यावर कार र्स्टाट करता तेव्हा गरम, प्लास्‍ट‍िक सारखी हलकी गंध जाणवते. आपण कधी विचार केला की हा वास कसला आणि कुठून येतो?
 
जेव्हा कारचे चारी दारं बंद असतात तेव्हा त्यात डॅश बोर्ड, सीट, एसी डक्ट्स आणि इतर प्लास्टि‍क किंवा फायबर निर्मित असतं, ज्यातून बेंझिन गॅस निघते. बेंझिन एक विषारी आणि अत्यंत हानिकारक गॅस आहे ज्यामुळे कर्करोग सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात जेव्हा आपण कारमध्ये बसता आणि काच उघडण्याऐवजी एसी ऑन करता तर ही गॅस वार्‍याच्या रेणूंसह आपल्या शरीरात प्रवेश करते. ही गॅस अत्यंत हानिकारक ठरते.
 
बेंझिन गॅसमुळे व्यक्ती कर्करोगाला बळी पडू शकतो. या व्यतिरिक्त गॅसमुळे हाडांवर देखील विषारी प्रभाव पडतो. यामुळे आपल्या रक्तात आढळणारे पांढरा रक्त पेशीं नष्ट होतात आणि प्रतिरोध क्षमता कमी होऊ लागते. या व्यतिरिक्त शरीरात बेंझिनच्या दुष्प्रभावामुळे अॅनिमिया आणि ल्युकेमिया चे लक्षण दिसू लागतात.
 
गर्भवती महिलांसाठी देखील हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. बेंझिनचा किडनी आणि यकृतावर देखील प्रभाव पडतो. सर्वात हैराण करणारे म्हणजे आमचं शरीर गॅस बाहेर काढण्यात आणि दुष्प्रभावापासून बचाव करण्यात पूर्णपणे असमर्थ आहे.
 
साधारणपणे कोणत्याही बंद स्थानावर बेंझिन गॅस मानक पातळी 50 मिलीग्राम प्रति स्क्वेअर फूट आहे. तसेच बंद जागेवर पार्क कारमध्ये बेंझिन पातळी 400 ते 800 मिलीग्राम पर्यंत असतं, अर्थात मानक पातळीहून 8 पट अधिक. खुल्या वातावरणात पार्क कार जेथील तापमान 60 फारेनहाइटहून अधिक असेल, तर बेंझिन पातळी 2000 ते 4000 मिलीग्राम अर्थात मानक पातळीपेक्षा किमान 40 पट समजा.
 
अशात काच बंद कारमध्ये जाऊन बसल्याने तेथे अत्यधिक प्रमाणात आढळणार्‍या बेंझिन गॅसला श्वसनाद्वारे शरीरात घेऊन कॅसर सारख्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.