शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया

स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी आपल्या जीवनशैलीत महत्वपूर्ण बदल करून, योग्य आहार घेणे गरजेचं आहे. आपल्या शरीराला स्थिर ठेवण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. अतिरिक्त वजन आणि चरबीवाढीने बेजार झालेल्या व्यक्तींना देखील स्थिर आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. बैरीयाट्रिक सर्जरीने ते शक्य होत आहे. शरीराची बनावट सजवण्यासाठी लिपोसक्शन किवा टमी टक्ससारखी प्रक्रिया केली जाते. मुळात सर्जरीला पर्याय म्हणून केल्या जाणाऱ्या या प्रकीया घातक असून, बैरियाट्रिक सर्जरीमध्ये याचा समावेश नसतो. त्यामुळे, सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छिते की, शरीराची बनावट पूर्ववत करण्यासाठी केली जाणारीशस्त्रक्रिया आणि अन्य दोन प्रकार एकसारख्या नसून, विज्ञानाचा हा एक निव्वळ भ्रम आहे.

जी लोकं असामान्य रुपात स्थूल आहेत, त्यांना वजन कमी करण्यासाठी बैरियाट्रिक सर्जरी एक वरदान ठरत आहे. ह्या सर्जरीद्वारे गेस्ट्रो-इंटेसटीनस एनाटोमी बदलून वजन कमी करता येते, या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांमध्ये अनेक चांगले परिणाम घडून आले आहेत.  

लिपोसक्शन आणि टमी टक्सची प्रक्रिया वजन कमी करण्याची प्रमुख प्रक्रिया नाही. शरीराचा आकार आकर्षक करण्यासाठी या प्रक्रियांचा वापर केला जात असला तरी, लिपोसक्शनमुळे केवळ ६ ते ८ किलोपर्यंत वजन कमी करता येते. मात्र, बैरियाट्रिक सर्जरीनंतर २० ते १०० किलोपर्यत (रुग्णांच्या सुरुवातीच्या वजनावर आधारित) वजन कमी करू शकतात. या व्यतिरिक्त स्थूलपणाशी जोडल्या गेलेल्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, डाईलीपिडेमिया, पीसीओडी, हृदयविकार, एसिड रिफ्लेक्स, वांझोटेपणा ई.उपचारांमध्येही त्याचा सहयोग होतो.
स्वास्थासाठी वेळापत्रक

 वजन वाढते म्हणून जेवणाला घाबरण्याची काहीच चिंता नाही, केवळ अतिरिक्त खाणे टाळा. घरचे पारंपारिक जेवण दररोज घेत असाल, तर आठवड्यातून एकवेळ बाहेर खालले तरी चालेल.
 दररोज ३० मिनिटे व्यायाम करावा. दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किवा दोनदा ४५ मिनिटे व त्याहून अधिक वेळ हा व्यायामासाठी द्यायलाच हवा.
 आपले वजन नियमित तपासा, शरीरात होणाऱ्या बदलांचे परीक्षण करणे महत्वाचे असून, त्यासाठी नियमित डॉक्टरांचे सल्ले घेणे अत्यावश्यक आहे.
 दिवसाअखेर केवळ स्वतःसाठी वेळ द्या, काही मिनिटे स्वतःला इतर सगळ्या गोष्टींपासून स्वीच ऑफ करा. तणावमुक्त होणे खूप महत्वाचे आहे.
 पुरेसं पाणी प्या, फेस असणारे शीतपेय पाण्याला पर्याय असूच शकत नाही.
 वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेमुळे दीर्घकाळ फायदा होतो. कारण त्यामुळे रुग्णाची खाण्या-पिण्याची सवय बदलते.

जीवनशैलीत परिवर्तन आल्यामुळे रुग्णाचे आयुष्य कमालीचे बदलून जाते. डायजेस्टीव हेल्थ इंस्टीट्यूटमध्ये आम्ही  आमच्या रुग्णांना शस्त्रक्रियेच्याआधी आणि नंतर दीर्घकाळस्वरूपी पथ्य अवलंबणाऱ्या ई-जर्नीवर भर देतो. जेणेकरून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल दीर्घकाळ घडून येतात, बैरीयाट्रिक सर्जरीविषयी अनेक साधे प्रश्न लोकांना पडतात, त्याचे उत्तर मी खाली दिले आहेत.

बैरीयाट्रिक सर्जरी कोणत्या बीएमआई चाचणीनंतर केली जावी ?
बैरीयाट्रिक सर्जरीचा सल्ला २७:५ – ३२:५ किंवा ३२:५ – ३७:५ ची बीएमआईच्या बरोबर स्थूल असणाऱ्या रुग्णांना दिला जातो.

या शस्त्रक्रियेवेळी किती जखम आणि दुखापत होते?
डायजेस्टीव हेल्थ इंस्टीट्यूटमध्ये आपण सिंगल इंसाईशन लेप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये कुशल आहोत. याचा अर्थ असा की, वजन कमी करण्याची संपूर्ण शस्त्रक्रिया एका कटवर केली जाते. त्यामुळे दुखापत कमी होते, आणि जखमदेखील कोणत्याहीप्रकारचा डाग किवा निशाण मागे न राहता तात्काळ भरून निघते.

बैरीयाट्रिक सर्जरीसाठी वयाची मर्यादा काय असायला हवी?
बैरीयाट्रिक सर्जरीला वयोमर्यादा नाही. १५ वयोगटातील किशोर मुलांवरदेखील शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. परंतु कोणतीही शस्त्रक्रिया ही हाडांचा संपूर्ण विकास झालेल्या रुग्णांचीच करणे अधिक योग्य ठरेल.

अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णाला देखील याचा लाभ घेता येऊ शकेल का?
मधुमेहच्या दुस-या स्तरावर असणारे आणि ५० टक्केच्यावर स्थूल असणारे रुग्ण बैरीयाट्रिक सर्जरी करतात. शस्त्रक्रियेच्या ७ दिवस आधी रुग्णांना कमीत कमी केलेरीयुक्त भोजन करणे अनिवार्य आहे, जेणेकरून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी डायबेटोलॉजीस्ट / इडोक्रिनोलॉजीस्टला भेटायला हवे. बैरीयाट्रिक सर्जरीनंतर औषधे आणि इन्सुलिनची आवश्यकता कमी होते. आमच्या अभ्यासात असे आढळले आहे की, बऱ्याच रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर ३ ते ६ महिन्यांनी मधुमेह निरोधक उपचाराची आवश्यकताच राहिली नाही.

बैरीयाट्रिक सर्जरीनंतर गर्भधारणा करता येते का?
सर्जरीमुळे स्थूल रुग्णांचे वजन कमालीचे घटते, त्यामुळे लगेच गर्भधारणाची शक्यता वाढते. परंतु त्यासाठी एक वर्ष वाट पाहण्याचा मी सल्ला देईल.