शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

वयाच्या तिशीनंतर....

वय वाढत जातं तसे शरीरांतर्गत अनेक बदल होत जातात. त्यानुसार शरीरासाठी काही गोष्टी अत्यावश्यक ठरतात. त्या ओळखून त्यांची पूर्तता करणं गरजेचं ठरतं. उदाहरण द्यायचं तर वयाच्या तिशीनंतर शरीरात काही व्हिटॅमिन्स तसंच मिनरल्सची कमतरता भासू लागते. ती पूर्ण झाल्यास आरोग्य उत्तम राहतं. वयाच्या या टप्प्यावर शरीरासाठी 'क' जीवनसत्व आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं ठरतं. त्यासाठी आहारात पालक, ब्रोकली तसंच सोयाबिन ऑईलचा समावेश आवश्यक करायला हवा. यातून या जीवनसत्वाची रोजची 122 ते 138 मायक्रोग्रॅमची गरज पूर्ण होऊ शकते. या शिवाय वयायच्या तिशीनंतर बी-6 जीवनसत्तवाचीही अधिक गरज भारसते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या शिवाय रक्तातील लाल पेशींची सख्याही वाढते. बी-6 जीवनसत्वासाठी आहारात केली, बटाटा अंडे, मासे यांचा पर्याप्त मात्रेत सामवेश करायला हवा. या वयात बी-12 या घटकाची पुरेशी मात्रा मिळणंही गरजेचं ठरतं. पनचशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी तसंच मेंदूचं आणि रक्ताचं कार्य नीच चालण्यासाठी हा घटक महत्ताचा ठरतो. यासाठी आहारात दूध, दही, पनीर, चिकन यांचा समावेश करायला हवा. त्याद्वारे शरीराची दररोजची 2.4 मिलिग्रॅम या प्रणातील बी-12 ची आवश्यकता पूर्ण होऊ शकते. वयाच्या तिशीनंतर शरीराची कॅल्शियमची गरज वाढते. हे प्रमार सर्वसाधारणपणे दररोज एक हजार मिलीग्रँम इतकं असतं. त्यासाठी आहारात दूध, अन्य डेअरी प्रॉडक्ट्स, बदाम, सोयाबिन, संत्रे आदींचा वापर वाढवायला हवा. या शिवायही अन्य काही खनिजं तसंच जीवनसत्वांची पर्याप्त मात्रा गरजेची ठरते. त्यासाठी योग्य ती माहिती गेऊन त्या प्रमाणे आहारातील बदल तुमचं आरोग्य अबाधित ठेवू शकतो.