1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पापडाचे अति सेवन म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण

रोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो. पापडाचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास त्यामुळे ह्रदयविकार होण्याची दाट शक्‍यता असते.
 
पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांमुळे पापडाची चव वाढते, परंतु या पापडाच्या अति सेवनाने आपल्या आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. पापडमुळे शरीराला होणारे नुकसान हे टाळता येऊ शकत नाही. 
 
पापडाच्या अति सेवनाने हृद्यसंबधीत आजारांचा धोका वाढतो. तसेच किडनीवर वाईट परिणाम होतो. वजन वाढते आणि पापडाच्या अति सेवनाने ऍसिडीटीची ही समस्या वाढीस लागते.