testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बसला तो संपला

office sitting
रामदास स्वामींनी म्हटले आहे, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. आपण हा कायदा पाळत तर आहोतच पण जरा जास्तच प्रमाणिकपणाने पाळत आहोत आणि थांबायला तयार नाही. पण आपण आता कामाच्या निमित्ताने एवढे एका जागी बसत आहोत की बसल्या जागी कामे करणारांना थोडे उठा, चालायला लागा, फार बसला तो संपला, असे सांगावे लागणार आहे.
हे आपल्यासाठी आवश्यचकच झाले आहे. कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय काम करतात यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. अधिक काळ कामासाठी एका जागेवर बसणारे लोक लवकर मरण पावण्याची शक्यता आहे.

जे लोक एकाच जागेवर सलग एक किंवा दोन तास बसतात त्यांच्या बाबतीत मृत्यूचा धोका अधिक आहे. मात्र, एक किंवा दोन तास बैठे काम करताना अधूनमधून उठत असेल आणि दर अर्ध्या तासाला बसल्या जागेवरून उठून चालत असेल, काही हालचाल करीत असेल तर ही लवकर मरण पावण्याची जोखीम तुलनेने कमी आहे.
तेव्हा आपण किती तास बसता याला महत्त्व आहेच पण त्यापेक्षा सलग किती वेळ बसता आणि उठबस करण्याचे वेळापत्रक कसे आहे याला महत्त्व आहे. सांगायचे झाले तर बैठे काम करणे अपरिहार्यच असेल तर ते करणे भागच आहे पण ते करताना दर अर्ध्या तासाला उठावे आणि चार पावले चालावीत.


यावर अधिक वाचा :

मुंबईत दूधबंदी आंदोलनाचा परिणाम नाही

national news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम ...

फेसबुक वेड, दुचाकी चालवतांना केले लाईव्ह, २ ठार

national news
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन ...

खड्ड्यांप्रकरणी MNS कार्यकर्त्यांनी PWD ऑफिसात केली तोडफोड

national news
मुंबई- ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आता पर्यंत सहा लोकांची मृत्यू ...

हॅरी केननेला मिळाला 'गोल्डन बूट'

national news
फ्रान्सने क्रोएशियाला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला. दुसरीकडे इंग्लंडचा संघ चौथ्या ...

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

national news
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून ...