गाजर एक गुण अनेक, डोळ्यांपासून त्वचेपर्यंत मिळेल फायदा
गाजराचे कुठल्याही रूपात नेमाने सेवन केल्याने तुमच्या डोळ्याची चमक दुरुस्त राहते. यात बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असत, जे खाल्ल्यानंतर पोटात जाऊन विटामिन ए मध्ये बदलून जातो. डोळ्यांसाठी विटामिन ए फारच गरजेचे असते. विटामिन ए रेटीनात परिवर्तित होतो.
गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिर्याच्या रूपात करू शकता. त्याच बरोबर गाजराचे ज्यूससुद्धा फायदेशीर असते.
आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबूटी आहे.
गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवा दूर होण्यास मदत मिळते.
गाजरात रक्त अवरोधक शक्ती असते म्हणून हे रक्तपित्त तयार होऊ देत नाही. तसं तर गाजर थंड प्रवृत्तीची असते पण हे कफनाशक आहे.
गाजर, लवंग व आल्याप्रमाणे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढण्यात सक्षम आहे. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला स्वस्थ ठेवतात.