शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (09:44 IST)

तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या ‍हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहे. तर जाणून घ्या काय आहेत तिळगुळ खाण्याचे फायदे-
 
तिळात कॅल्शियम, मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ आढळतात. हे हाडांसाठी आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
 
तीळा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं.
 
तिळामध्ये निसर्गतः उष्ण गुणधर्म असतात. शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी तिळगुळाचे सेवन फायद्याचे ठरतं.
 
तीळ पचायला जड असतात म्हणून थंडीत भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे. 
 
तीळ बारिक करून खाल्याने बद्धकोष्टाची समस्या दूर होते. 
 
तिळामध्ये आढळणारं सेसमीन नावाचं एक अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचं काम करतात.