शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पीरियड्सच्या वेदनांपासून मुक्तीसाठी त्या दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या

मासिक धर्म वेदनांपासून मुक्तीसाठी आहारात सामील करा हे पदार्थ
 
दर महिन्यात चार दिवस किंवा एका आठवडा महिलांवर मासिक धर्माचे दिवस फार जड जातात. पीरियड्स येण्यापूर्वी आणि त्या दरम्यान अनेक त्रासाला सामोरा जावं लागतं. अशात महिलांनी 
 
त्या कशा प्रकाराचा आहार घेत आहे याकडे लक्ष द्यावं कारण याचा परिणाम आरोग्यावर होतो. जाणून घ्या या वेळेत काय खावे आणि काय नाही.
 
अख्खं धान्य वाळवलं किंवा प्रोसेस केलं जात नाही त्यामुळे यातील पोषक तत्त्व टिकून राहतात. हे कार्बोहायड्रेट्स आहेत जे सेरोटोनिन रिलीज करतात. सेरोटोनिन हार्मोनमुळे या दिवसात आराम 
जाणवतो.
 
पीरियड्स दरम्यान भूक कमी होऊन जाते आणि शरीरात आयरनची पातळी कमी होऊ लागते म्हणून या दरम्यान दुपारच्या जेवण्यात हिरव्या पालेभाज्या सामील कराव्या. याने शरीराला पुरेसे 
 
पोषक तत्त्व आणि व्हिटॅमिन्स K मिळतं. हे रक्तस्राव आणि ब्लड क्लॉटिंगला नियंत्रित करतं.
 
पीरियड्स दरम्यान सॅलमन आणि टूना सारखे मासे खाल्ल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं.
 
पीरियड्समध्ये गोड खाण्याची इच्छा होते. अशात केक, किंवा मिठाई सारखे इतर काही गोड पदार्थ खाण्यापेक्षा गोड फळं खाणे योग्य ठरेल.
 
या दरम्यान ताण, चिडचिड यापासून मुक्तीसाठी मिंट किंवा आळं-मधाचा चहा पिणे योग्य ठरतं. याने मानसिक शांती मिळते.
 
पीरियड्सच्या दरम्यान काळं मीठ मिसळून कोमट पाण्याने अंघोळ केल्याने आणि भरपूर झोप घेतल्याने आराम मिळतो.
 
हे पदार्थ टाळा
 
-कॉफी किंवा कॅफीन युक्त पेय पदार्थ. याने ताण वाढतो आणि डिहायड्रेशनचा धोका असतो.
-तळकट पदार्थांचे सेवन टाळावे. याने वेदना वाढतात.
-साखरेचे सेवन करणे टाळावे. याने सुस्ती वाढते आणि ताण व चिडचिड होते.