testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

झटपट सुके मटण

nonveg
वेबदुनिया|
साहित्य : १ किलो मटण, ४/५ हिरव्या मिरच्या, आले, १ छोटा लसूण, कांदा, गरम मसाला, २/३ कांदे, लसूण, ४/५ टेबलस्पून तिखट, हळद, हिंग, तमालपत्री, १/२ वाटी गोडे तेल, कोथिंबीर, चवी पुरते मीठ.
कृती : हिरव्या मिरच्या, आले व लसूण एकत्र करून त्याची पेस्ट करून घेणे. मटण चांगले धुवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवा, त्यामध्ये ४/५ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका त्याबरोबर तमालपत्री टाका. लसूण तांबूस झाला की हिंग, बारीक चिरलेला कांदा टाका. तो चांगला गुलाबी झाला की मटण टाका. आले-लसणाची पेस्ट टाका. नंतर चांगली परतवून घ्या, लाल मसाला, हळद घाला. चांगले हलवून/एकत्र करून पातेल्यावर झाकण ठेऊन त्यात पाणी ठेवा. १५ मिनिटे शिजवा. त्यामध्ये गरम मसाला घाला, कोथिंबिर घाला. बस, तयार!


यावर अधिक वाचा :