साहित्य : ४/५ मोठय़ा आकाराच्या सुरमयीच्या तुकडय़ा, हळद, २ चमचे मिरची पावडर, आले, १ लूसण, कांदा, ४/५ हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, तेल, २ बटाटे, ब्रेडक्रश, अर्धा चमचा कोकम पावडर, चवीपुरते मीठ.
कृती : आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या. २ बटाटे उकडून घ्या, सुरमयीच्या तुकडय़ा थोडय़ा वाफवून किंवा तव्यावर थोडय़ाश्या तेलामध्ये परतवून घ्या व त्याचे काटे काढून टाका. बटाटा कुस्करून घ्या. त्यात सुरमयीचे तुकडे, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर, आले-लसून पेस्ट, कोकम पावडर, ब्रेडक्रश हे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. तव्यावर थोडे तेल घाला व वरील मिश्रणाच्या वडय़ा करून त्या चांगल्या तळून घ्या. पाच मिनिटात कटलेट तयार. हे कटलेट टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर मस्त लागतात.