शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

अवधी मटण कोरमा

साहित्य : 750 ग्रॅम बोनलेस मटण, 100 मिली तेल, 300 ग्रॅम बारीक कापलेला कांदा, 25 ग्रॅम आलं लसूण पेस्ट, दोन ग्रॅम वेलची, दोन ग्रॅम लवंगा, एक ग्रॅम कलमी, एक चमचा तिखट, पाच ग्रॅम जावीतरी, 100 ग्रॅम दही, 50 ग्रॅम काजू पेस्ट, 25 ग्रॅम सनफ्लॉवर सीड, 25 ग्रॅम कोकोनट पेस्ट, 5 ग्रॅम काळेमिरे पूड चवीनुसार मीठ. 

कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा (200 ग्रॅम) घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात मटण, आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतून त्यात 200 मिली पाणी घालावे. कलमी, वेलची, लवंगा, तिखट, जावीतरी पूड आणि मीठ घालावे. बाकी उरलेले कांदे घालून झाकण ठेवावे. कमी आचेवर 20 मिनिट शिजवावे. नंतर झाकण काढून घ्यावे व तेल सोडेपर्यंत शिजवावे. आता दह्याला फेटून त्यात घालावे व काही मिनिट शिजवावे. जेव्हा मीट नरम होईल आणि ग्रेवी घट्ट होईल तेव्हा बाकी साहित्य घालून चांगल्या प्रकारे हालवावे. आता या अवधी मटणाला कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.