शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

प्रॉन जिंजर सूप

साहित्य : सोललेली (स्वच्छ केलेली) कोळंबी एक वाटी, दोन वाट्या पाणी (चिकन स्टॉक असल्यास उत्तम), अर्धा चमचा आलं किसून चमचाभर सोया सॉस, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर तिखट, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर, दीड कप पाणी, अर्धा चमचा बटर. 
 
कृती : साफ केलेल्या कोळंबीचे अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत. दीड वाटी पाण्यात कोळंबीचे तुकडे उकळी येईपर्यंत झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यावेत व चाळणीवर ओतून वेगळे ठेवावेत. 
 
आता एका कढईत बटर टाकून पातळ झाल्यावर त्यात चिकन स्टॉक किंवा पाणी घालून त्यात आल्याचा कीस, सोया सॉस, मीठ, तिखट घालून उकळी आणावी. उकळी आल्यावर कॉर्नफ्लोअर लवून दाट करावं. त्यात कोळंबीचे तुकडे टाकावेत व उतरवावं.