शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

मटणाचा तांबडा रस्सा

साहित्यः अर्धा किलो मटण, 2 कांदे, 1 टोंमॅटो, 5 लसण्याच्या लसूण पाकळ्या, आले, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर.
 
मसाल्यासाठी साहित्य: 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, 2-3 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 काळी मिरी, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा ओले खोबरे, 1 चमचा सुखे खोबरे, 2 वेलदोडे.
कृती: वरील सर्व मसाला थोड्या तेलात भाजून मिक्सरमधे बारीक वाटून घ्या. निम्मे आले, लसूण, हळद, मीठ घालून मटण चांगले शिजवून घ्या. एका पातेल्यात तेल घालून उरलेले आले-लसूण, चिरलेले कांदे, टोमॅटो घालून परता. हळद, तिखट, मीठ घालून चांगले परता. नंतर वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत भाजा. आता शिजलेले मटण घाला, वरून पाणी गरम करून घाला. रस्सा थोडा पातळ करून चांगली उकळी येऊ द्या. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.