शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

हॉट चिली चिकन

साहित्यः ६५० ग्रा. चिकन तुकडे, २ मोठे चमचे टोमॅटो प्युरी, २ कळी लसुण कापलेली, २ कापलेली हिरवी मिरची, २ सुकी लाल मिरची, १/२ चमचा मीठ, १/४ चमचा साखर, १ चमचा मिरची पावडर, १/२ चमचा तेल, १/२ चमचे जीरे, १ कापलेला कांदा, १/४ चमचे वाटलेली हळद, ४०० ग्रा. कापलेले टोमॅटो, ३/४ पाणी, १ चमचा गरम मसाला, ४ लांब कापलेली हिरवी मिरची. 
 
कृतीः टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत, लाल मिरची, तसेच चिकन मसाला ग्राईन्डर मध्ये वाटुन पेस्ट बनवावी. 
 
मोठ्या गॅस कढईत तेल गरम करून जीरे कडकवावे. नंतर कांदा, तेजपाने टाकुन ४-५ मिनीट फ्राय करावे. ग्राईन्डर मसाला टाकावा आणि हळद टाकावी व २ मिनीटे भाजून टोमॅटो आणि पाणी टाकून कमी गॅसवर घट्ट पेस्ट बनवावी. चिकन व गरम मसाला टाकावा आणि कमी गॅसवर २०-२५ मिनीटे किंवा चिकन गळेपर्यंत शिजवावे. नंतर सर्विंग डिशमध्ये काढून वरून  लांब कापलेली हिरवी मिरचीने सजवावे व पोळी बरोबर खावे.