1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (22:51 IST)

Delicious Donuts: लहान मुलांचे आवडते डोनट्स घरीच बनवा रेसिपी जाणून घ्या

donuts
Delicious Donuts:डोनट्स सर्व मुलांना खूप आवडतात, ते मेदू वडासारखे गोल आकाराचे असतात, परंतु त्याची चव गोड असते. यीस्ट-समृद्ध, गोड, असणारे डोनट्स घरी देखील बनवू शकता. चला साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य-
1 कप मैदा
1/2 वाटी साखर पावडर
2 टेस्पून दुध पावडर 
1 टीस्पून बेकिंग सोडा
1 कप दूध
तेल तळण्यासाठी 
10 ब्रेडचे तुकडे
पीनट बटर 
 
कृती- 
सर्वप्रथम एक बाऊल घ्या. बाऊलमध्ये  मैदा,  साखर पावडर, मिल्क पावडर, बेकिंग पावडर घालून सर्वकाही चांगले मिसळा.
आता त्यात एक कप दूध घालून मिक्स करून घट्ट पीठ बनवा आणि झाकण ठेवून बाजूला ठेवा.
आता ब्रेडचे 10 स्लाईस घ्या आणि दोन ब्रेड लाटून चपटे करा.
ब्रेडच्या दोन्ही तुकड्यांवर दूध लावा, आता एक चमचा पीनट बटर घेऊन  ब्रेडच्या मध्यभागी ठेवा.
बटर पसरल्यानंतर त्यावर दुसरी ब्रेड ठेवा आणि ब्रेडला ग्लासच्या मदतीने गोल कापून घ्या.
त्याचप्रमाणे सर्व ब्रेडवर पीनट बटर लावून ग्लासच्या मदतीने कापून डोनट्स बनवा.
कढईत तेल टाकून गरम करायला ठेवा.
ब्रेडपासून तयार केलेले डोनट्स दुधाच्या पिठात कोट करा आणि मध्यम आचेवर तेलात तळा.
सर्व डोनट्स अशा प्रकारे तळून घ्या आणि कॅस्टर शुगरने सजवा, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चॉकलेट वितळवून डोनट्समध्ये कोट करू शकता.
 
Edited by - Priya Dixit