बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2024 (08:00 IST)

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

kesari bhat
साहित्य-
एक कप तांदूळ 
अर्धा कप दूध 
काजू  
बादाम  
किशमिश  
अर्धा टीस्पून वेलची पूड 
एक टीस्पून नारळाचा किस 
एक टीस्पून टरबूज बिया 
एक टीस्पून शुद्ध तूप 
केशर धागे 
अर्धा कप साखर 
 
कृती-
केशर भात बनवण्यासाठी सर्वात आधी तांदूळ स्वच्छ करून घ्यावे. मग स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालावे. आता कढईमध्ये शुद्ध तूप घालावे. आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू, बादाम, किशमिश घालून भाजून घ्यावे. आता ते एका बाऊलमध्ये काढावे. आता तांदूळ घालावे. व भाजून घ्यावे. काही वेळ तांदूळ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालावे व शिजवून घ्यावे. आता एका वाटीमध्ये गरम दूध घालून त्यामध्ये केशर घोळून घ्यावे. आता हे केशर युक्त दूध तांदळामध्ये घालावे. व चांगल्याप्रकारे हलवून घ्यावे. भातात दूध आणि पाणी अर्धे राहिल्यानंतर चवीनुसार साखर मिक्स करा व शिजवून घ्या. तांदूळ तो पर्यंत शिजवा जोपर्यंत पाणी आटत नाही. आता यामध्ये वेलची पूड घालावी.  व वरतून भाजलेले ड्रायफ्रूट्स घालावे व टरबूज बिया घालाव्या. एक मिनिट आजून शिजवल्यानंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपला केशरी भात रेसिपी, दत्त जयंतीला नैवेद्यात नक्कीच ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik