शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

मँगो पुडिंग

साहित्य : 2 हापूस आंबे, 1 कप पिठीसाखर, 2 मारी बिस्किटाचे पुडे, 2 कप दूध, 1 कप क्रीम, 2 टेस्पून कॉर्नफ्लॉवर, 1/4 चमचा मँगो इसेन्स, 1 चमचा तूप, थोडे काजूचे काप व थोड्या चेरी.

कृती: आंब्याचा रस काढावा. कॉर्नफ्लॉवर दूध व 2 टेबलस्पून साखर एकत्र करुन त्याचे कस्टर्ड करुन घ्यावे. त्यात मँगो इसेन्स घालावा. आंब्याच्या रसात साखर घालून गॅसावर ठेवावे व जरा आटवून घ्यावे.बिस्किटचा चुरा करावा. काचेचा चौकोनी भांड्यात तळाला आंब्याचे मिश्रण घालावे. नीट पसरावे. तूपावर मारी बिस्किटाचा चूरा परतून घ्यावा व भांड्यात घालावा. हाताने जरा दाबावे. त्यावर कस्टर्ड घालावे व फ्रीजमध्ये ठेवावे. थंडगार करावे. आयत्या वेळी क्रीम, काजू व चेरी घालून सर्व्ह करावे.