शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2015 (12:04 IST)

मँगो मलई बर्फी

साहित्य: 2 लीटर सायीसकट दूध, 1 वाटी साखर, 1 कप आंब्याचा रस, 1 चमचा कॉर्नफ्लॉअर, अर्धा चमचा सायट्रिक अँसिड, काजूंची जाड पूड (ऐच्छिक), वेलदोडे पूड 1 चमचा, केशरी रंग 1 थेंब, चांदीचा वर्ख, पिस्ते काप.

कृती: दूध उकळून निम्मे करा. त्यात सायट्रिक अँसिडचं पाणी थोडं-थोडं घाला. मग कॉर्नफ्लॉअरची अगदी कमी पाणी घालून केलेली पेस्ट, साखर व आंब्याचा रस घाला. काजू पूड, रंग व थोडी वेलदोडे पूड घाला. कडेने सुटू लागलं की, बटरपेपर लावलेल्या ट्रेमध्ये ओता. वर उरलेली वेलदोडे पूड, त्यावर चांदीचा वर्ख, त्यावर पातळ चिरलेले पिस्ते काप पेरा. दहा-बारा तासानंतर पाऊण इंच जाड बर्फी कापा.