बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

बासरी ठेवल्याने घरात येतो पैसा

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की बासरी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे. बासरीचे अनेक प्रकार आहेत, परंतू बांबूच्या आणि चांदीच्या बासरीचा प्रभाव विशेष परिणामकारक असतो.
* चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैश्याची अ‍डचण भासत नाही.
* सोन्याची बासरी घरात असेल तर घरात लक्ष्मी सदैव राहते, त्या घरात पैसाच पैसा असतो.
* बांबूच्या झाडापासून तयार केलेल्या बासरी तात्काळ उन्नतिदायक प्रभाव दाखवते. ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही, किंवा शिक्षण, व्यवसाय, नोकरीत अडचणी येत असतील तर त्या लोकांनी आराम खोलीच्या दरवाजावर दोन बासर्‍या लावाव्यात.
* घरात वास्तुदोष असेल, दोन दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजावर दोन बासर्‍या लावणे फायद्याचे ठरेल.
* घरात एखाद्या सदस्य आजारी असेल तर, त्या व्यक्तीच्या खोलीबाहेर किंवा खोलीत बासरीचा उपयोग करावा लवकर चांगले परिणाम दिसून येतील.