गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

स्‍थापत्य वेद- वास्तूविषयी सर्व काही

आरण्यकात रूपाला व्यक्तरूप देऊन त्यात चेतना (प्राण) आणून त्याची स्थापना करणे म्हणजेच स्थापत्य वेद होय. हा चार प्रमुख वेदांमधल्या अथर्ववेदाचा उपवेद आहे. यात विश्वातल्या सगळ्या वस्तूंची लांबी, ऊंची, आकार, रंग, चव हा रासायनिक किंवा कोणत्याही प्रकारचे गुणधर्म यांचा शिवाय विश्वात असणार्‍या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे. या शिवाय जे दृष्य नाहीत (चेतना, स्पंदन, आवाज) त्यांचाही अभ्यास आहे. दुसर्‍या शब्दात भूगर्भशास्त्र, खगोल, भूगोल, भौतिक, रसायन, वनस्पती, सामुद्रिक, गणित, ज्योतिष या शिवाय इतर सर्व विषय जे माणसाच्या राहण्याशी संबंधित आहेत त्याचा अभ्यास केला आहे. हे सर्व विषय स्थापत्य वेदाचेच विषय आहेत. याचाच अभ्यास, विवेचन, मंथन करून घर बांधण्यासंबंधित सर्व सिद्धांताचे व नियमांचे प्रतिपादन वास्तुशास्त्रात केले आहे.

स्थापत्य वेद 3 भागात विभागला आहे.
1. वास्तुशास्त्र 2. ‍प्रतिमा विज्ञान (शिल्पकला) 3. चित्रकला

स्थापत्यवेद एक विज्ञान आहे. माणसाच्या जीवनातील कामे व त्यांचे जीवन यासंबंधीचे नियम वेदात सांगितले आहेत. अर्थ, गृह-चिकित्सा, मनोरंजन या सारख्या गोष्टींचे नियमही वेदात तसेच उपवेदात आहेत. ऋग्वेदाचा आयुर्वेद चिकित्सेसाठी, यजुर्वेदाचा धनुर्वेद शांती तसेच रक्षणासाठी, सामवेदाचा गंधर्ववेद-कला व मनोरंजनासाठी व अथर्ववेदाचा स्थापत्यवेद घर बांधणी व नियोजनासाठीच लिहिला आहे.

शिल्पकला -
भारतात अना‍दीकालापासून मंदिरे, प्रासाद यांचे फार महत्व आहे. वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती व प्रतिमांची प्रतिष्ठापना करून, मंदिरे बांधून त्याची पूजाअर्चा केली जाते. हे भारतीय संस्कृतीचे एक अंगच आहे. याला वास्तुशास्त्रातही फार महत्व आहे कारण वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा, त्यांची शस्त्रे-अस्त्रे, वाहने, चेहरे व भावांना प्रकट करून त्यात उर्जेचे संचार करणारे वास्तुशास्त्रही उर्जेचेच शास्त्र आहे.

प्रतिमा विज्ञान (मूर्तीकला) यात वेगवेगळ्या देवतांचे वर्ण, अस्त्र-शस्त्र, ध्वज, आभूषण तसेच त्यांच्या चेहर्‍यावरील भावभावनांचा अभ्यास केला जातो. तसेच त्याची पूजा अर्चना मंत्रोच्चार, पूजाविधी यांचेही विवेचन केले जाते.

वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या देवांची पूजा-अर्चा मंत्रोच्चारण करून वास्तुदोष कमी केले जातात व आवश्यक उर्जेचा संचार घरात केला जातो. वास्तुशास्त्रात देवतांच्या प्रतिमांचे आजही महत्व आहे, ते म्हणजे वास्तुमंत्रात दाखवलेल्या 45 देवतांची पूजा-अर्चना, अस्त्र-शस्त्र, वाहन या गोष्टींचे विवेचन तसेच वास्तुदोष शोधांचे विश्लेषण केले जाते.

वैज्ञानिकांनी हे सिद्ध केले आहे की प्रत्येक देवतेच्या प्रतिमेचे एक आभामंडळ असून त्यात सात रंग असतात. वरील सर्व गोष्‍टीचे विवेचन वास्तुशास्त्रात केले आहे. हे ही स्थापत्यवेदाचे महत्वाचे अंग आहे.

चित्रकला -
मनाचे भाव व विचार यांना रेखाचित्राने व रंगाने मांडणे म्हणजे चित्रकला. ही एक प्राचीनकला असून भारतीय संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे, जे मानवी संस्कृती बरोबरच विकसित झाले आहे. राजवाड्यात, मंदिरात, घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणती चित्रे काढावीत व कोणती नाही हा वास्तुशास्त्राचा विषय आहे. पूर्वीपासुनच भारतात वेगवेगळी चित्रे व चिन्हे शुभ-चिन्हांना काढले जात असे. ज्यामुळे स्वत:च्या व दुसर्‍याच्या विचारांना, भावनांना बदलता येते. चित्र पाहून मनस्थिती बदलले यासाठी देव देवतांच्या मूर्ती चित्रे व शुभ-चिन्हांना शुभ मानले जाते. आधुनिक काळात घराच्या अंर्तसजावटीतही याचे विवेचन आढळते.

वास्तुशास्त्र -
वास्तुशास्त्र हे घर बांधणीचे शास्त्र आहे ज्यात घराची मजबूती, सौंदर्य, राहणार्‍या मनुष्याची गरज तसेच सुविधांबरोबरच नैसर्गिक तसेच अन्य बाबींचा विचार केला जातो. ग्रंथात घरबांधणीचे निर्देश दिले आहेत. घर बांधताना पंचतत्वे (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) याबरोबरच सूर्याचा प्रकाश, पृथ्वीची उर्जा, चुंबकीय शक्ती याचा योग्य वापर केल्याने त्यात रहाणार्‍याला आरोग्य, सुख व समृद्धी मिळते.

आधुनिक किंवा पाश्चात्य पद्धतीने बांधलेल्या घरात, माणसाच्या गरजा, सोयी, सौंदर्य आणि मजबूतीचा विचार केला जातो. पण भौतिक व नैसर्गिक गोष्टी विचारात घतल्या जात नाहीत.

मनुष्य निसर्गाचाच एक भाग आहे आणि घर बांधताना वापरलेली जाणारी सामग्रीही नैसर्गिकच आहे त्यामुळे माणूस निसर्गाच्या बरोबर मिळून मिसळूनच आपला विकास करू शकतो व सुखी, संपन्न राहू शकतो. निसर्गाच्या विरोधात जाऊन नाही. म्हणूनच आपल्या ऋषिमुनींनी वेदाच्या अभ्यासातून मिळवलेले ज्ञान मनुष्याचे कल्याण, जनकल्याण तसेच विश्वकल्याणासाठी वापरणे योग्य ठरेल.आधुनिक विज्ञानात या सर्व बाबी लागू होतात.