1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2024 (16:29 IST)

उरलेल्या भाताचा चविष्ट नाश्ता, जाणून घ्या रेसिपी

idli
अनेक लोकांच्या घरात खूप वेळेस भात उरतो, आपण काही वेळेस तो भात शिळा म्हणून टाकून देतो. तुम्हाला माहित आहे का? शिळ्या भातापासून चविष्ट नाश्ता देखील बानू शकतो. तर चला जाणून घेऊ या रेसिपी 
 
साहित्य- 
 भात साधारण 2 कप 
1 वाटी बारीक रवा 
अर्धा कप बेसन 
अर्धा कप दही 
अर्धा चमचा बेकिंग सोडा 
1 चमचा हिरवी मिरची 
आले पेस्ट 
मीठ चवीनुसार 
अर्धी वाटी पाणी 
अर्धा चमचा बारीक साखर(पिठी साखर)
 
कृती- 
भातामध्ये बेसन, दही, पाणी मिक्स करून बारीक वाटून घ्यावे. हे मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट, मीठ, पिठीसाखर, व रवा टाकून मिक्स करावे. मग काही वेळ ठेऊन इडली पत्रामध्ये इडली बनवतो तसे ठेवावे. वाफवल्यावर इडलीपात्रातून कडून थंड  झाल्यावर सुरीच्या मदतीने याचे छोटेछोटे पीस करावे. मग आता कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, तयार इडलीचे पीस टाकावे. यानंतर वरतून तिखट घालावे. आता हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाताचा हा चविष्ट नाश्ता सॉस सोबत सर्व्ह करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik