शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (21:10 IST)

चविष्ट इडली बर्गर रेसिपी

कोणत्याही खाण्याच्या डिश वर वेगवेगळे प्रयोग करून त्याला अधिकच चविष्ट बनवता येत. अशीच एक प्रयोगात्मक रेसिपी आहे  इडली बर्गर. जे खाऊन मुलांना आनंद येईल. आपण नक्की करून बघा ही रेसिपी संध्याकाळी चहा बरोबर खाण्यासाठी चांगली आरोग्यदायी डिश आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
 
6 इडल्या, 4 चमचे कोथिंबीर पुदिना चटणी, 3 चमचे चिरलेला टोमॅटो, 4 कांदे बारीक चिरलेले, 1 कप तेल, 2 कप चिरलेल्या भाज्या (मटार,गाजर, बटाटे),1 चमचा मैदा,चिमूटभर हळद पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट,1/2 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीप्रमाणे.
 
कृती -
एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा आणि इडली सोनेरी तपकिरी रंग येई पर्यंत तळून घ्या. लक्षात ठेवा की बाहेरून ही इडली  खुशखुशीत असावी आणि आतून मऊ.
इडलीच्या एका बाजूला चटणी लावा. चिरलेल्या भाज्या उकळवून घ्या. पाणी काढून थंड होऊ द्या.
कांदा,आलं-लसूण पेस्ट, हळद,तिखट,धणेपूड,आणि गरम मसाला घालून कढईत परतून घ्या. थंड होऊ द्या.
भाज्या आणि कांदाच्या मिश्रणाला मॅश करा या मध्ये मैदा, कोथिंबीर, आणि मीठ घालून मिक्स करा. इडलीच्या साइजचे कटलेट बनवा. कटलेट सोनेरी रंग येई पर्यंत हलकं फ्राय करा. 
बर्गर सारखे बनविण्यासाठी कटलेट दोन इडलीच्या मध्ये ठेवा आणि त्यात टोमॅटो आणि कांद्याचे तुकडे घाला. इडली बर्गर खाण्यासाठी तयार.