गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : रविवार, 11 सप्टेंबर 2022 (17:33 IST)

तूरडाळ पकोडा

साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने बारीक चिरून, 1 इंच आलचा तुकडा खिसून, चिूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी.
 
कृती : प्रथम तूरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सर जारमध्ये लाल सु्रा रिच घालून त्याची पेस्ट
बनवून घवी. नंतर जारमध्ये निथळलेली तूरडाळ घालावी. त्यातच लाल सु्रमा मिरचीची पेस्ट घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. भजाचे पीठ परत एकदा हातानेच मिक्स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम 
तेलात सोडावे. भजी हलक्या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली की, पेपरनॅपकीनवर काढावीत. म्हणजे जादाचे तेल शोषले जाईल. आता तयार गमर तूरडाळ पकोडा चटणी अथवा केचपसोबत खाणस द्या.