मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

Last Modified रविवार, 24 जानेवारी 2021 (13:30 IST)
दररोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे आणि घरात ब्रेड आणि रवा सगळेच आहे मग आपण ह्याचा वापर करून चविष्ट उत्तपा करू शकता. ब्रेड चे सँडविच तर नेहमीच खातो. पण जेव्हा दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांची गोष्ट करावी तर हे आरोग्यासाठी चांगले तर असतंच आणि लोकांना देखील आवडते. आज ज्या रेसिपी बद्दल बोलत आहोत ती बनवायला सोपी आहे आणि मुलांना आवडणारी देखील. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

साहित्य -

4 ब्रेडचे स्लाइस, 1/2 कप रवा, 2 मोठे चमचे मैदा, 1/2 कप दही, 1 मोठा चमचा आलं किसलेलं, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 ढोबळी मिरची बारीक चिरलेली ,1 टोमॅटो बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीपुरती, तेल आवश्यकतेनुसार, पाणी आवश्यकतेनुसार.

कृती -

सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाइसचे कडे कापून घ्या आणि पांढऱ्या भागावर पाणी लावून त्यांना मऊसर करा.हे स्लाइस रवा,तेल आणि दह्यासह मिसळून पेस्ट बनवून घ्या लक्षात ठेवा की पेस्ट अशी बनवायची आहे की सहजपणे तव्यावर पसरेल. या पेस्ट मध्ये भाज्या ढोबळी मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा घालून मिश्रण मिक्स करा. आता या मिश्रणात शेवटून मीठ घाला जेणे करून मिश्रणाला पाणी सुटणार नाही.
तवा गरम करण्यासाठी
ठेवा.आता तव्यावर तेल घाला आणि गरम झाल्यावर उत्तप्याचा घोळ घालून पसरवून द्या. एकी कडून शेकून झाल्यावर पालटून द्या आणि थोडंसं तेल सोडा. दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम उत्तपे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...