रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

तेल न वापरता बनवा मसाला भेंडी रेसिपी, जी आहे आरोग्यासाठी फायदेशीर

masala bhendi
कोलेस्ट्रॉल आणि हार्ट च्या रुग्णांना चिकित्सक नेहमी ऑइल फ्री जेवण जेवण्याचा सल्ला देतात. तर जे वजन कमी करण्यासाठी डाएट वर असतात ते देखील ऑइल फी जेवणे पसंद करतात. पण काही वेल्स  ऑइल न वापरता जेवण बनवणे खूप कठीण जाते. चव देखील लागत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ऑइल फ्री मसाला भेंडी कशी बनवावी तर चला जाणून घेऊ या रेसिपी जी आरोग्यासाठी देखील आहे फायदेशीर 
 
साहित्य-
अर्धा किलो भेंडी 
दोन चमचे बेसन 
दोन चमचे नारळाचा किस 
मीठ चवीनुसार 
एक चमचा आमसूल पावडर 
हळद 
तिखट 
अर्धा चमचा साखर
धणे पूड 
जिरे पूड 
 
कृती-
नारळाचा किस ड्राय रोस्ट करून घ्या. आता बेसन पॅनमध्ये परतवून घ्यावे. आता नारळाचा किस, बेसन, भाजलेले जिरे, कोथिंबीर, हळद, तिखट, साखर हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आता भेंडी स्वच्छ धुवून भेंडीला मधून काप द्यावा. हा तयार झालेला मसाला भेंडीमध्ये भरावा. 
 
तसेच स्टीमर गरम करावे आणि प्लेटमध्ये सर्व भेंडी ठेऊन अर्धा तासापर्यंत शिजवावी. व तयार झाल्यानंतर गरम सर्व्ह करावी.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik