शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कैरीची आंबटगोड चटणी

साहित्य: 3 कैर्‍या, 1 चमचा तेल, 1 लाल मिरची, अर्धा वाटी साखर, मीठ, मोहरी मेथी, जिरे, बडीशेप, कांद्याचे बी.

कृती: कैरीच्या सालासकट लांबट फोडी कराव्या. नंतर ह्या फोडी तासभर पाण्यात टाकून ठेवाव्या. तेलात मोहरी, मेथी, जिरे बडीशेप, कांद्याचे बी घालून फोडणी करा. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे घाला. थोडी हळद घालून परता. नंतर त्यात 1 कप पाणी घाला. कैर्‍या थोड्या शिजू द्या. नंतर त्यात साखर घाला. जरा दाटसर झाले की गॅसवरून उतरवून घ्या.