शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (10:20 IST)

पराठे बनवताना या 5 टिप्स वापरा, चवीला नव्हे तर आरोग्यासाठी फायदेशीर

आज आपल्याकडे न्याहारीत जरी बरेच पर्याय असले, तरी जेव्हा पराठे बद्दल बोलायचे तर ते कुटुंबीयातील सदस्यांची पहिली आवड असते. तर कुटुंबीयातील सदस्यांची चव आणि त्याच बरोबर त्यांचा आरोग्याकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं असतं. आज आम्ही आपणास पराठे बनविण्याच्या काही आरोग्यदायी टिप्स सांगत आहोत जे आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह आपली भूक देखील भागवतील. 
 
पराठा बनविण्याची कृती - 
आरोग्यदायी पराठे बनविण्यासाठीच्या काही टिप्स -
 
1 पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यामध्ये पालकाची पेस्ट, राजमाची पेस्ट, हरभऱ्याची पेस्ट घातल्यास पराठ्याची चव वाढण्यासह त्यात पोषक घटक देखील वाढतात.
 
2 पनीर बनवताना त्यामधून काढलेल्या पाण्याचा वापर पराठ्याच्या कणकेला मळण्यासाठी करावं. हे द्रव्य प्रथिनं, प्रोबायोटिक्स आणि इतर पोषक घटकांचे चांगले स्रोत मानले जाते.
 
3 पराठ्यांचे सारण करण्यासाठी बटाटे आणि पनीरच्या व्यतिरिक्त सोया, कॉर्न, अवाकाडो, ब्रोकोली आणि सातूचा वापर देखील करता येऊ शकतो. हे चवीला तर चांगलेच आहे त्याच बरोबर सुपर हेल्दी असतात.
 
4 पराठे बनविताना आपण त्याची चव वाढविण्यासाठी त्यात कोथिंबीर, पुदिना, तुळशी किंवा ओवा देखील घालू शकता.
 
5 आपण पराठे खाताना खरपूस लागत असल्यास ते खाण्याची मजा दुपटीने वाढते. पराठ्यात सारण भरताना आपण यामध्ये एक मूठ चिया बियाणे, भोपळा बियाणे, सूर्यफुलाचे बियाणे मिसळू शकता. हे सर्व बियाणं ऊर्जा देण्यासह पौष्टिक घटकांनी देखील समृद्ध असतात.