शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कर्ड खिमा

साहित्य: अर्धा किलो खिमा, 2 कप दही, 5 चमचा तूप, प्रत्येकी 1 चमचा जिरे, धणेपूड व तिखट, 1 चमचा आले व 1 चमचा लसूण पेस्ट, दीड चमचा मीठ, साखर अर्धा चमचा, 1 चमचा बीट किसून, 2 तमालपत्रे, 4 हिरवे वेलदोडे, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा/जायफळ व केवडा इसेन्स 1 थेंब.
कृती: तूप तापवा. त्यात जिरे, धणेपूड, तिखट घाला. नंतर गॅस बंद करा. वाटलेले आले, लसूण, मीठ व साखर घाला. त्यानंतर खिमा घाला. ब्राऊन रंग येईपर्यंत परता. दही घुसळून घाला. किसलेले बीट व गरम मसाला कुटून घाला. खिमा कोरडा करा व शेवटी जायफळ व केवडा इसेन्स पाण्यात मिसळून घाला.