1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 23 नोव्हेंबर 2014 (05:40 IST)

कोथिंबिरीचा झुणका

साहित्य :  कोथिंबीर एक जुडी, हरभरा डाळ एक वाटी, कांदे दोन मोठे, लसूण कांदा एक, हिरव्या मिरच्या पाच-सहा, तेल पळीभर, हळद अर्धा चमचा, धने एक चमचा, जिरं एक चमचा, चवीनुसार मीठ .
 
कृती :- कोथिंबीरीच्या जाड काडया काढून ती बारीक चिरून, धुऊन निथळून घ्यावी. डाळ तीन तास आधी भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटावी. वाटताना त्यामध्ये लसूण, धने, जिरं आणि चमचाभर मीठ टाकावं. वाटलेलं मिश्रण हळद घालून कोथिंबीरीमध्ये एकजीव करावं. कांदा उभा पण जाडसर चिरावा. जिरं-मोहरीची फोडणी करून कांदा घालावा. कांदा बदामी रंगाचा झाल्यावर एकजीव केलेलं मिश्रण घालावं. अलगद हलवावं. पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी. नंतर परत अलगद हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता शिजू दयावी. झुणका गरम असतानाच भाकरी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.