शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

झुणका भाकर (व्हिडिओ पहा)

साहित्य : बेसन 250 ग्रॅम, तेल, दोन मोठे कांदे, लसूण पाकळ्या 4, कोथिंबीर, आले, 5 हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी.

कृती : झुणका बनविताना सर्वप्रथम बेसन बारीचाळणीतून चाळून घ्यावे. एका पातेल्यात बेसन टाकून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे. हे द्रावण चांगले हलवावे.

कढई गरम करून त्यात तेल टाकावे. मोहरी टाकून नंतर कांद्याचे लांब कांघालावेत. कांदा थोडा तांबूस झाल्यावर त्यात लसूण, जीरे व आले यांची पेस्ट घालावी.

संपूर्ण मिश्रण तेलात चांगले भाजून झाल्यावर त्यात मिरच्यांची पेस्टही टाकून भाजून घ्यावी. नंतर बेसनाचे द्रावण घालावे.


द्रावण व मिश्रण एकमेकांत चांगले घुसळूघ्यावे. कोथिंबीर, थोडा गरम मसाला घालून मिश्रणात आवश्यक तेवढे गरम पाणी घालावे चमच्याने घुसळत रहावे. आवडीनुसार झुणका पातळ किवा घट्ट करता येतो.

गरमागरम झुणका बाजरीची, ज्वारीची किंवा मक्क्याची भाकरीबरोबर सर्व्ह करा.