शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : मंगळवार, 19 मे 2015 (12:09 IST)

बटाटा शेवपुरी

साहित्य : 1 वाटी पांढरे वाटाणे, 2 हिरव्या मिरच्या, 8-10 पाणीपुरीच्या पुर्‍या, 2 उकळलेले बटाटे, दही, तिखट, गोड चटणी, बारीक शेव व कोथिंबीर. 
 
कृती : सर्वप्रथम रात्री पांढरे वाटाणे चिमूटभर सोडा घालून पाण्यात भिजत घालावे. सकाळी त्यात मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. हिरव्या मिरचीचा ठेचा करून त्यात घाला. पाणीपुरीच्या पुर्‍या थोड्या कुस्करून घ्या. त्यावर उकळलेल्या बटाट्याच्या छोट्या फोडी, दही, तिखट व गोड चटणी घाला. सर्वात नंतर त्यावर बारीक शेव घाला व सर्व्ह करताना कोथिंबीरीने सजवून द्या.