गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अभिनंदची सुटका होणार, इम्रानने संसदेत केली घोषणा

abhinandan varthaman to free tomorrow
पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या उद्या सुटका होणार. पाकिस्तान संसदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली.
 
उल्लेखनीय आहे की बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. तत्पूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. जखमी अवस्थेतील वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते.