शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 मार्च 2018 (10:22 IST)

होय, आता चक्क आयुर्वैदीक अंडी

गावठी आणि बॉयलर कोंबडीच्या अंड्यांनंतर आता बाजारात चक्क आयुर्वैदीक अंडी आली आहेत. या एका आयुर्वैदिक अंड्याची किंमत २२.५० रुपये आहे. आयुर्वैदिक अंड हे चिन्ना हर्षवर्धन रेड्डी यांनी तयार केलं आहे. अशा प्रकारे अंड तयार करण्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला. अमेरिकेतून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलेल्या हर्षवर्धन रेड्डी यांनी सौभाग्य ग्रुप नावाने पोल्ट्री बिजनेस सुरु केला आहे.

आंध्रप्रदेशातील रवुलापडू गावात राहणारे चिन्ना हर्षवर्धन रेड्डी यांनी आयुर्वैदिक अंड बनवण्यापूर्वी सहा वर्ष संशोधन केलं. त्यानंतर त्यांना आयुर्वैदिक अंड बनवण्यात यश आलं. आयुर्वैदिक अंड्यांची विक्री तेलुगू भाषी राज्यांसोबतच बंगळुरुमध्ये केली जात आहे. सामान्यत: अंड्याच रंग हा सफेद असतो. मात्र, सौभाग्यतर्फे बनवण्यात येणाऱ्या अंड्याचा रंग गुलाबी आहे. 

सौभाग्य हैतचेरीच्या कोंबड्यांना विविध पोषणतत्व असलेलं खाद्य दिलं जातं. या खाद्यात लसुन, हळद यासोबतच ४० आयुर्वैदिक खाद्यांचं मिश्रणही दिलं जातं. या कोंबड्यांना मिनरल वॉटर दिलं जातं. सौभाग्य पोल्ट्री तर्फे बनवण्यात येणारी 'आयुर्वैदिक अंडी' दोन प्रकारची आहेत. पहिलं आयूर प्लस आणि दुसरं गावठी कोंबडीचं अंड. आयूर प्लस कोंबड्यांच्या एका अंड्याची किंमत १२.५० रुपये आहे. तर, गावठी कोंबडीच्या एका अंड्याची किंमत २२.५० रुपये आहे.