testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अमेठीत काँगेसला जोरदार धक्का

Last Modified मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (12:35 IST)

अमेठीत काँगेसला जोरदार धक्का बसला आहे.

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जंग बहादूर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा यांच्या अमेठी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जंग बहादूर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
जंग बहादूर सिंह हे काँग्रेसचे महासचिव होते. जंग बहादूर यांच्यासह अमेठीतील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्षाच्या धोरणावर नाराज असल्याने मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे सिंह यांनी सांगितले.

सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेसाठी काहीच केले नाही. अमेठीतील रस्त्यांची अवस्था बघूनच परिस्थितीचा अंदाज येईल. या भागातील अनेक कंपन्यांही आता बंद झाल्या आहेत, असे सिंह यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :